Health Tips: आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खा, कधीच होणार नाही गॅस आणि ॲसिडीटीचा त्रास

आवड्यातून दोन ते तीन वेळा ही भाजी खाल्लीत तर उष्णतेपासून तुमचे संरक्षण होईल. तसेच गॅस आणि अॅसिडीटीची समस्या असेल तर ती देखील दूर होईल.

| Updated on: Aug 17, 2026 | 10:35 AM
1 / 5
अवेळी खाणे, सतत फास्ट फास्ट फूड खाणे, झोप पूर्ण न होणे या सगळ्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अॅसिडीटी होणे, गॅस होणे, पोट साफ न होणे अशा अनेक समस्या होत असल्याचे दिसते. पण या सर्व समस्यांवर एक उपाय आहे. एक अशी भाजी आहे जी खाल्ल्यामुळे शरीराला मोठा फायदा होतो. आता ही भाजी कोणती आहे? जाणून घ्या...

2 / 5
शेवगा एक अशी भाजी आहे जी सुपरफूड म्हणून ओळखली जाते. तिला मोरिंगा देखील म्हटले जाते. ही भाजी पोषक तत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शेवगा उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक आदर्श आहार आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डाळ, डोसा, भाजीची आमटी किंवा सूपसोबत या भाजीचे सेवन केल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.

3 / 5
शेवगा खाल्ल्यामुळे अनेक आजारांवर उपचार होतो. कारण, या भाजीमध्ये  व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. तसेच शेवगा हाडांचे दुखणे देखील नियंत्रणात आणते.

4 / 5
या भाजीच्या सेवनाने जास्त घाम येणे, थकवा आणि उष्माघात यांसारख्या उष्णतेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. सोबतच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

5 / 5
शेवगामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे आतड्यांची सूज नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच गॅस, अॅसिडीटी यासारख्या समस्या देखील कमी होतात. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us