Eetha Movie Release Date : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ ची रिलीज डेट जाहीर; ह्या तारखेला चित्रपटगृहांत येणार सिनेमा
श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर हिने प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारली आहे. टीझरनंतर प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या रिलीज डेटची उत्सुकता लागली आहे. कधी प्रदर्शित होणार आणि चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रिलीज तारीख जाणून घेण्यासाठी खालील माहिती जरूर वाचा.

eetha
- Eetha Movie Release Date: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या आपला आगामी सिनेमा ‘ईठा’मुळे (Eetha) चर्चेत आहे. ‘ईठा’ सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा होऊ लागली आहे.
- या सिनेमात कोण कोणते कलाकार झळकणार? हे अद्याप उघड झालेलं नाही. माहितीनुसार, श्रद्धा कपूरने ‘ईठा’ या सिनेमात प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांची भूमिका साकारली आहे.
- या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. फिल्ममेकर्सने या सिनेमाच्या रिलीज डेटबाबत मोठी माहिती दिली आहे. ‘ईठा’ सिनेमाचा ट्रेलर नेमकं कधी रिलीज होणार?
- ‘ईठा’ या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. ‘ईठा’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सध्या प्रेक्षक ‘ईठा’ या सिनेमाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलरमधून प्रेक्षकांना आणखी नवीन काय पाहायला मिळणार? कोणत्या नवीन कलाकारांची झलक पाहायला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- ‘ईठा’ या सिनेमातून श्रद्धा कपूरचा कधी न पाहिलेलं रुप प्रेक्षकांना बघायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता आहे. श्रद्धा कपूरचे पात्र अशा एका स्त्रीची कथा सांगते, जे लोकांना प्रेरित करेल. Laxman Utekar दिग्दर्शित ‘ईठा’ या सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची नेमकी काय रिअॅक्शन असणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us