एका रात्रीत टाचांच्या भेगा होतील गायब, घरीच करा रामबाण उपाय

टाचांना भेगा पडल्यास घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्याचा वापर, स्क्रबिंग आणि तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते. या बातमीत सविस्तर उपाय आणि काळजी घेण्याच्या पद्धती वाचा.

Namrata Patil | Updated on: Jan 14, 2026 | 4:03 PM
1 / 6
हिवाळ्यात किंवा कोरड्या हवामानामुळे टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास वेदना आणि संसर्ग होऊ शकतो. टाचांच्या भेगांवर घरगुती उपायाबद्दल जाणून घ्या.

2 / 6
टाचांना भेगा पडणे याला वैद्यकीय भाषेत हील फिशर्स म्हणतात. प्रामुख्याने त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे हा त्रास होतो. यासाठी आपण रात्री झोपण्यापूर्वी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकावा. यानंतर १५-२० मिनिटे पाय या पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे मृत त्वचा मऊ होते आणि सहज निघून जाते.

3 / 6
पाय भिजवल्यानंतर प्युमिस स्टोन (Pumice Stone) किंवा फूट स्क्रबरच्या मदतीने टाचांवरील मृत त्वचा हलक्या हाताने घासून काढावी. यामुळे भेगा भरून येण्यास मदत होते.

4 / 6
पाय कोरडे केल्यानंतर त्यावर खोबरेल तेल, एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करावी. व्हॅसलिनमध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास भेगांवर लावल्यात त्या लवकर भरतात.

5 / 6
मधामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. अर्धा बादली कोमट पाण्यात एक कप मध मिसळून त्यात पाय ठेवल्यास त्वचा मऊ होते. तसेच पिकलेले केळे कुस्करून त्याचा लेप टाचांवर १५ मिनिटे लावावा आणि नंतर पाय धुवावेत.

6 / 6
यातील कोणतेही उपाय केल्यानंतर टाचांवर क्रीम किंवा तेल लावून सुती मोजे (Cotton Socks) घालून झोपावे. यामुळे ओलावा टिकून राहतो. तसेच पाय लवकर बरे होतात.