
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी ओळखले जातात, त्यांच्या याच संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय शिवसेना आमदार संतोष बांगर यांना अनुभवायला मिळाला.

आमदार बांगर यांच्या मातोश्री वत्सलाबाई बांगर यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याने त्यांची तब्येत काल अचानक खालावली.

त्यामुळे हिंगोली येथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला नेण्याचे सुचवले. त्यामुळे बांगर यांनी तत्काळ फोन करून शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली

क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी आमदार बांगर यांच्या मातोश्रीसाठी विशेष एअर अँब्युलन्स नांदेडला पाठवली. या एअर अँब्युलन्स मध्ये बसून आमदार बांगर आणि त्यांच्या मातोश्री मुंबई विमानतळावर पोहोचले.

मुंबई येथे येताच शिंदे यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेतली, तसेच आस्थेने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

शिंदे यांनी तत्काळ एअर अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्या आईचे प्राण वाचणे शक्य झाले, त्यामुळे केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत. तर प्रत्येक शिवसैनिक हा आपल्यासाठी आपल्या कुटुंबासारखाच असून त्याच कर्तव्य भावनेतून ही मदत केली असल्याचे शिंदे यांनी विनम्रपणे सांगितले.