‘इमरान हाशमीसोबत इंटिमेट सीन पुरेसे नव्हते, म्हणून जेनेलिया वहिनी रियलिटी शो मध्ये असं लाजिरवाणं’, ‘गनमास्टर जी 9’ प्रमोशनवरुन वातावरण तापलं
Emraan Hashmi-Genelia deshmukh : अभिनेता इमरान हाशमी आणि जेनेलिया देशमुख सध्या 'गनमास्टर जी 9' या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच ते 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिर्टन' च्या विशेष एपिसोडमध्ये चित्रपट प्रमोशनच्या निमित्ताने आले होते.

या रियलिटी शो चा एक प्रोमो बाहेर आला आहे. त्यावरुन इंटरनेटवर डिबेट सुरु झाली आहे. अनेक सोशल मिडिया युजर्सना 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिर्टन' च्या सेटवरची इमरान आणि जेनेलियाची कृती पटली नाही. चित्रपट प्रमोट करण्यासाठी दोघे आलेले. पण तिथे जे घडलं, त्यावरुन वादविवाद सुरु आहेत.
इमरान हाशमी आणि जेनेलिया देशमुखने 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिर्टन'च्या सेटवर जो रोमान्स दाखवला, त्यावर चौफेर टीका होत आहे. या चित्रपटात 'दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर' हे गाण आहे, या गाण्यातली रोमँटिक मूमेंट त्यांनी रिक्रएट केली. त्यावरुन वाद सुरु आहे.
जेनेलिया बेंचवर बसलेली असते. त्यावेळी इमरान हाशमी तिथे येऊन पोहोचतो. तिच्या बाजूला बसून तिने कानात घातलेली इयररिंग आपल्या ओठांनी काढतो. समोर बसलेले स्पर्धक हे पाहून अवाक होतात. काही जण ओरडून त्यांच्या या रोमँटिक सीनला दाद देतात.
हा प्रोमो समोर आल्यानंतर अनेक नेटिझन्सनी एक्सवरुन कमेंट केल्या आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'कल्पना करा, एखाद्या मुलीने रितेशसोबत असं केलं असतं तर..' अशा पद्धतीच्या Reactions या प्रोमोच्या व्हिडिओवर येत आहेत.
"चित्रपटाच्या पडद्यावर इमरान हाशमीसोबत असे रोमँटिक आणि इंटिमेट सीन करणं पुरेसं नव्हतं. म्हणून वहिनी रियलिटी टीव्ही शो मध्ये असं लाजिरवाण प्रमोशन करत आहेत. स्पर्धकांच्या प्रतिक्रिया पाहा, त्यांना धक्का बसलाय" अशी एकाने कमेंट केली आहे.