AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China Flying Car : टेस्लाला टक्कर देण्यासाठी चीनची तयारी? पंख नसलेल्या फ्लाईंग कारची चीनकडून यशस्वी चाचणी

टेस्लाने बनवलेली आकाशात उडणारी कार याचंच आपल्याला आतापर्यंत आश्चर्य वाटत होतं, पण आता ती कार बाजारात येणाच्या आधीच चीन टेस्लाशी स्पर्धा करताना दिसतं आहे. टेस्लाने फ्लाईंग कार आणली बरोबर, मग तिच्याच तोडीला तोड म्हणून चीनने देखील फ्लाईंग कार आणली, पण पंख नसलेली

China Flying Car : टेस्लाला टक्कर देण्यासाठी चीनची तयारी? पंख नसलेल्या फ्लाईंग कारची चीनकडून यशस्वी चाचणी
| Updated on: Nov 23, 2026 | 7:08 PM
Share

टेस्लाने बनवलेली आकाशात उडणारी कार याचंच आपल्याला आतापर्यंत आश्चर्य वाटत होतं, पण आता ती कार बाजारात येणाच्या आधीच चीन टेस्लाशी स्पर्धा करताना दिसतं आहे. टेस्लाने फ्लाईंग कार आणली बरोबर, मग तिच्याच तोडीला तोड म्हणून चीनने देखील फ्लाईंग कार आणली, पण पंख नसलेली. या कारच्या प्रोटोटाईपने यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. या कारला उडण्यासाठीही धावपट्टीची गरज नाही. या प्रोटोटाईपचा हवेत कमाल वेग ताशी 150 किमी आहे. तर रेंज 300 किमीपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

21 नोव्हेंब 2026 रोजी चीनमधील हुनान प्रांतातील चांगशा येथील काईहुई जनरल एव्हिएशन विमानतळावर या प्रोटोटाईपची पहिली चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान वाहनाने यशस्वी उड्डाण केलं आणि सुरक्षितपणे लँडिंगही केलं. या प्रकल्पाची सुरूवात 30 ऑक्टोबर 2026 रोजी चांगशी इकॉनॉमिक अँड टेक्नोलॉजिकल डेव्हलपमेंट झोनमध्ये झाली होती.

पंख नसतानाही हवेत कशी उडते

या उडणाऱ्या कारचं सर्वात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे तिचं पॉवर सिस्टिम. यात मल्टी-स्टेज व्हेटर डक्टेड फॅन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच उड्डाणासाठी लागणारे फॅन आणि पॉवर युनिट वाहनाच्या आत बसवण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या बाजूला पंखे किंवा प्रोपेलर दिसत नाही.

या यंत्रणेतूनच निर्माण होणाऱ्या हवेचा दाब आणि जोराची दिशा नियंत्रित केली जाते. त्यामुळे वाहनाला वर उचलण्यासोबतच हवेत त्याचा तोल आणि दिशा सांभाळता येते. या तंत्रज्ञानामुळे धावपट्टीशिवाय उड्डाण आणि उभ्या दिशेने लँडिंग करणं शक्य होतं. हवेत एकाच जागी थांबण्याची क्षमताही यात आहे.

150 किमी ताशी वेग, 300 किमी रेंज

या प्रोटोटाईपची काही महत्त्वाची वैशिष्ट्यंही समोर आली आहेत. हे सिंगल सीटर म्हणजेच एका व्यक्तीसाठी तयार केलेलं मॉडेल आहे. याचं कमाल टेक ऑफ वजन 280 किलो असून, ते 120 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतं. जमिनीवर या वाहनाचा कमाल वेग ताशी 80 किमी तर हवेत ताशी 150 किमी आहे. या वाहनाची कमाल उड्डाण उंची 3, 000 मी असून, सामान्य कामासाठीची उंची सुमारे 100 मी आहे. एका चार्जिंग किंवा इंधन भरण्यानंतर 300 किमी पर्यंत रेंज मिळू शकते. असा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत नेमकी कोणती ऊर्जा यंत्रणा वापरली जाते आणि चार्जिंगसंबंधीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या प्रकल्पात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम उड्डाण करणाऱ्या एक-आसनी मॉडेलव्यतिरिक्त, ५.५ टन कमाल टेक-ऑफ वजन आणि २ टन भार वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मॉडेलची तांत्रिक रचना देखील पूर्ण झाली आहे. भविष्यात, २-४, ६-८ आणि १२-१५ प्रवाशांची क्षमता असलेली मॉडेल्स विकसित करण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग डोंगराळ भागांमध्ये आपत्कालीन वितरण, वैद्यकीय सेवा, अग्निशमन, पोलीस गस्त, हवाई सर्वेक्षण आणि परदेशी वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो.

या तंत्रज्ञानाचा वापर डोंगराळ भागात आपत्कालीन वस्तू पोहोचवणे, वैद्यकीय मदत, अग्निशमन, पोलिसांची गस्त, हवाई सर्वेक्षण आणि समुद्रावरून वाहतूक अशा कामांसाठी होऊ शकतो. भविष्यात शहरांमधील हवाई प्रवासासाठीही याचा विचार केला जात आहे. कंपनी आंतरशहरी हवाई वाहतूक आणि खाजगी हवाई प्रवासासाठी भविष्यातील एक पर्याय म्हणूनही याचा विचार करत आहे. २२ नोव्हेंबर रोजी, पुढील चाचणीसाठी हा प्रोटोटाइप यियांग नागरी मानवरहित हवाई वाहन उड्डाण चाचणी तळावर पाठवण्यात आला. येथे, विविध परिस्थितींमध्ये त्याची स्थिरता आणि कार्य करण्याची क्षमता तपासली जाईल.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू