AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरुन खासदार संतप्त, डॉ.श्रीकांत शिंदेंनी मुख्याधिकाऱ्याला भरसभेत झापले

अंबरनाथमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे याच्या हस्ते करण्यात आले आहे.

अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरुन खासदार संतप्त, डॉ.श्रीकांत शिंदेंनी मुख्याधिकाऱ्याला भरसभेत झापले
shrikant shinde
| Updated on: Nov 23, 2026 | 6:57 PM
Share

अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चांगलेच भडकल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरून त्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना दोनवेळा भर सभेत झापल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. अंबरनाथ पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर खासदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या लोकार्पणासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी उल्हासनगर शहरात रस्ते स्वच्छ होते, पण अंबरनाथमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाण पडलेली होती, असं म्हणत त्यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची चांगलीच खरडपट्टी काढली. अंबरनाथमध्ये आपण सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. पण या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घाण आहे, असं म्हणत शहरात फिरत जा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला.

नागरिकांना वॉटर, गटर, मीटर याच्यापालिकडे चांगल्या सुविधा आपण देत असून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठे प्रकल्प होत असलेली अंबरनाथ ही एकमेव नगरपालिका आहे. मात्र हे होत असताना शहर स्वच्छ ठेवणं ही तुमची ड्युटी असून तुम्ही तुमचं काम केलं नाही, तर मला आणि नागरिकांना विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे दोन चार्ज असल्यानं ते अंबरनाथला कमी येत असल्याची तक्रार अनेकदा समोर आली आहे. त्यामुळं आता खासदार श्रीकांत शिंदे हे या निमित्तानं शहराच्या हितासाठी काय निर्णय घेतात, हे आता पाहावं लागणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं लोकार्पण!

अंबरनाथमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आज लोकार्पण करण्यात आलं. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रूपाने अंबरनाथकरांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून इनडोअर आऊटडोअर खेळांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली असून यातून खेळाडूंना मोठा वाव मिळणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सध्या खासदार क्रीडा संग्राम सुरू आहे. यातील ऍथलेटिक्स खेळांच्या स्पर्धा नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होतायत. याठिकाणी ४०० मीटरचा ऑलिम्पिक लेव्हल सिंथेटिक रनिंग ट्रॅक फुटबॉल ग्राउंड, गोळाफेक, भालाफेक अशा ऍथलेटिक्सच्या इतर खेळांसाठी सुविधा आहेत. तर इनडोअर खेळांच्या सुविधाही लवकरच उपलब्ध होणार आहेत. याशिवाय समोरच असलेल्या शूटिंग रेंजमध्ये रायफल शूटिंगच्या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतून नवनवीन खेळाडू घडतील, यासोबतच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून शहरातील खेळाडूंना वाव मिळून खेळाडू देशपातळीवर शहराचं नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसंच अशाप्रकारचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सर्वच शहरांमध्ये उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू