EPFO: UPI च्या माध्यमातून मिनिटात काढा PF चा पैसा; कोट्यवधी कर्मचार्‍यांसाठी मोठी अपडेट

EPFO UPI Withdraw: युपीआयच्या मदतीने पीएफ काढणे हे कर्मचाऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते. या नवीन पद्धतीने पीएफची रक्कम लागलीच काढता येईल. तर त्यासोबतच बचत किती झाली हे पण समोर येईल. काय आहे याविषयीची अपडेट?

| Updated on: Apr 25, 2026 | 4:47 PM
1 / 6
EPFO UPI Withdraw: केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटना कोट्यवधी खातेदारांसाठी मोठा दिलासा देणार आहे. मीडियातील वृत्तानुसार, मे 2026 च्या अखेरीस युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

2 / 6
हा बदल ईपीएफओच्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म CITES 2.0 अंतर्गत हा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे याविषयीची प्रक्रिया अधिक गतिमान होईल. ईपीएफओमध्ये सध्या 7.98 कोटी सदस्य आहेत. तर 82 लाखाहून अधिक पेन्शनर्स आहेत. त्यातील 7.74 कोटी सदस्यांची केवायसी करण्यात आलेली आहे.

3 / 6
ईपीएफओच्या पोर्टलनुसार, एका वर्षात 6.42 कोटी क्लेम सेटल झाले आहेत. नवीन अपडेट्स नुसार कर्मचाऱ्यांना आता क्लेम रिजेक्ट होण्याचे कोणतेही टेन्शन नसेल. युपीआयच्या मार्फत त्यांना पेन्शन काढता येईल. UAN च्या माध्यमातून लॉगिन करता येईल. OTP व्हेरिफाय झाल्यानंतर युपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसे वळते करता येतील.

4 / 6
ईपीएफ स्कीम योजना 2026, EPS 2026, EDLI Scheme 2026 सारख्या सोयीसुविधा लागू होऊ शकतात. त्यामुळे पीएफ, पेन्शन आणि विम्याशी संबंधित नियम अधिक मजबूत होतील. या नियमातंर्गत अनेक बदल होतील. एका दाव्यानुसार, एकूण रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढता येईल. उर्वरीत रक्कम ही भविष्यासाठी वापरता येईल.

5 / 6
‘EPFO 3.0’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कर्मचाऱ्यांना बँकिंग सारख्या जलद सुविधा मिळतील. त्यांना पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज फाटे करावे लागणार नाहीत. तर पीएफ खात्यातून काढण्यासाठी मंजूरीची गरज नसेल. ही नवीन व्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि जलद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

6 / 6
पीएफ खाते हे युपीआय खात्यांशी (UPI) जोडले जाणार आहे. तर ईपीएफओ पोर्टल आणि उमंग  (UMANG) ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसा हस्तांतरीत करणे अधिक सोपे होईल. कर्मचारी GPay, PhonePe ॲपवरून पीएफ रक्कम काढू शकतील. ही रक्कम त्यांच्या लिंक्ड बँक खात्यात पीएफची रक्कम जमा होईल. या ऑनलाईन ॲपवर काही दिवसात ‘EPFO Withdrawal’ असा पर्याय मिळेल.

Follow Us