
दूध हे केवळ एक पेय नसून ते शरीरासाठी एक सुपरफूड मानले जाते. लहान मुलांच्या वाढीपासून ते वृद्धांची हाडं मजबूत ठेवण्यात दुधाचा वाटा मोलाचा असतो. मात्र तरीही काही लोकं दूध पिणं टाळतात. आज आपण दूधात कोणकोणते व्हिटॅमिन असतात, याची माहिती घेणार आहोत.

दूधामध्ये व्हिटॅमिन ए, डी, बी१, बी२, बी५ आणि बी१२ यासारखी शरीराला अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन असतात. दूधात हे सर्व व्हिटॅमिन नैसर्गिकरित्या आढळतात. दूधातील हे घटक शरीराला केवळ ऊर्जाच देत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून संरक्षणही करतात.

दूधातील व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. हे जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच त्वचा सतेज व निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. दूधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

पण ते शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते. या जीवनसत्वामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. ज्यामुळे भविष्यात हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.

दूधामध्ये व्हिटॅमिन बी चा समावेश असतो. दूधातील व्हिटॅमिन बी २ हे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते, ज्यामुळे थकवा दूर होतो. तसेच शरीर दिवसभर सक्रिय राहते. त्यासोबतच व्हिटॅमिन बी १२ मुळे हे जीवनसत्व मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अनिवार्य असते.

तसचे दूधातील व्हिटॅमिन बी१ हे मेटाबॉलिझ्मची क्रिया सुधारून हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन बी ५ हे हार्मोन्सच्या निर्मितीत आणि तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

जर तुम्ही दैनंदिन आहारात एक ग्लास दुधाचा समावेश केला, तर तुमच्या शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. दूधाला एक नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हटले जाते. हे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)