इतकं लोकप्रिय गाणं की 74 वर्षांपासून प्रत्येक व्यक्तीचं आवडतं, 100 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
74 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, जे ऐकलं तरी अंगावर येतो काटा. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचं आवडतं.

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळी छाप सोडली आहे. काळाच्या ओघात अनेक चेहरे विस्मरणात गेले असले तरी काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कलाकृतींमुळे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.

अशाच बहुआयामी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ गीतकार, संगीतकार आणि नृत्यदिग्दर्शक प्रेम धवन. देशभक्तीपर गीतांना नवी ओळख देणाऱ्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गाणी बहाल करणाऱ्या प्रेम धवन यांची आजही विशेष आठवण काढली जाते.

प्रेम धवन यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवते ते त्यांचे देशभक्तीपर गीतलेखन. विशेषतः शहीद या चित्रपटातील 'मेरा रंग दे बसंती चोला' हे गाणं आजही देशप्रेमाची भावना जागृत करते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आणि देशभक्तीची भावना या गीतातून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे.

प्रेम धवन यांच्या जीवनातील एक रंजक किस्सा आजही चर्चेत येतो. एकदा प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैया या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उशिरा पोहोचल्या. कारण त्यांच्या गाडीचा रस्त्यात बिघाड झाला होता.

त्यांनी हा अनुभव चित्रपटाच्या टीमला सांगितला. त्यातून प्रेरणा घेत प्रेम धवन यांनी तत्काळ 'कभी ना बिगड़े किसी की मोटर रस्ते में...' हे विनोदी गाणं लिहिलं. हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय ठरलं.