Diwali 2026 : दिवाळी नक्की कधी करायची साजरी, 7 की 8 तारखेला! जाणून घ्या योग्य मुहूर्त

Diwali 2026 : दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण... दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण आपल्या घरात पूजा करतात. धनत्रयोदशीपासून भाऊबीज आणि तुळशीच्या लग्नापर्यंत परंपरेनुसार, पुजा केली जाते. पण दिवाळी नेमकी कशी साजरी करायची याबद्दल देखील अनेकांना प्रश्न आहे... तर जाणून घ्या दिवाळी नक्की 7 की 8 तारखेला साजरी करायची...

| Updated on: Nov 06, 2026 | 1:07 PM
1 / 5
Diwali 2026 :  दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते, जो तूळ राशीचा महिना आहे. हा एक असा सण आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि ज्ञान व समृद्धीचा प्रकाश पसरवतो. दिवाळी या शब्दाचा अर्थ दिव्यांची रांग असा होतो.

Diwali 2026 : दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते, जो तूळ राशीचा महिना आहे. हा एक असा सण आहे जो अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि ज्ञान व समृद्धीचा प्रकाश पसरवतो. दिवाळी या शब्दाचा अर्थ दिव्यांची रांग असा होतो.

2 / 5

या वर्षीची दिवाळी 7 नोव्हेंबरला साजरी करावी की 8 नोव्हेंबरला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वास्तविक पाहता, या वर्षीची दिवाळी रविवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी आपल्या ग्रहावर अवतरते.

3 / 5

त्यामुळे, या दिवशी महालक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. महालक्ष्मीसोबतच, वाईटाचा नाश करणाऱ्या गणपतीचीही पूजा करावी. एवढंच नाही तर, यामुळे जीवनातील सर्व अडथळे आणि वाईट गोष्टी दूर होऊन जीवनात समृद्धी येते.

4 / 5

दिवाळीत सायंकाळी 5.45 ते 7.35 च्या दरम्यान महालक्ष्मी पूजा करणे उत्तम असते. याच वेळी घरात दिवे लावावेत. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवे लावावेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, पूजा खोलीत आणि स्वयंपाकघरात दिवा लावणं विशेषतः शुभ मानलं जातं.

5 / 5

दोन वाती एकत्र पेटवून त्यांची एक वात बनवणं अधिक शुभ मानलं जातं. दिवा पूर्व आणि पश्चिम दिशेला तोंड करून लावणं देखील चांगलं असतं. दिवा लावण्यासाठी शुद्ध खोबरेल तेल किंवा तूप वापरावं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us