जुन्या मोबाईलमधून सोने मिळवणे शक्य आहे का? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोबाईल लागतात?

जुन्या मोबाईल फोनमध्ये अनेक भागात सोने वापरलेले असते. या जुन्या मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटचे सोने रिसायकल करुन त्याचा पुनर्वापर करता येणे शक्य आहे का ? एका मोबाईलमध्ये नेमके किती सोने दडलेले असते हे वाचूयात...

| Updated on: Nov 27, 2026 | 10:53 AM
1 / 6
 जुन्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा मोठा स्रोत दडलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचा रिसायकल करुन पुनर्वापर केल्यास नैसर्गिक खनिज उत्खननावरील अवलंबित्व कमी करणे शक्य आहे.

जुन्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा मोठा स्रोत दडलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि त्याचा रिसायकल करुन पुनर्वापर केल्यास नैसर्गिक खनिज उत्खननावरील अवलंबित्व कमी करणे शक्य आहे.

2 / 6

आपल्या जुन्या मोबाईल फोनला रिसायकल करुन सोने मिळवणे शक्य आहे का ? सोन्याचे प्रमाण अधिक असलेल्या एका खाणीच्या एक टन खनिजातून साधारण एक ते दोन ग्रॅम सोने मिळते.

3 / 6

एक टन जुन्या मोबाईल फोनमधून (बॅटरी वगळून) सुमारे ३०० ग्रॅम सोने मिळू शकते असे तंत्रज्ञान कंपनी उमिकोर यांचे म्हणणे आहे.तर ३५ ते ४१ मोबाईल फोनमधून साधारण एक ग्रॅम सोने मिळू शकते. एका मोबाईल फोनमधून काढलेल्या सोन्याची किंमत एक पौंड म्हणजेच १.६७ डॉलरपेक्षाही कमी आहे.

4 / 6

मोबाईलमधून सोने वेगळे करण्याची प्रक्रिया व्यापारीदृष्ट्या फायदेशीर असली, तरी त्यातून मिळणारा नफा मर्यादित आहे.कचऱ्यातील मौल्यवान धातू आणि साहित्याचा पुनर्वापर करून चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर देण्याचा प्रयत्न युरोपियन युनियनने केला आहे.

5 / 6

जगभरात खाणकामातून दरवर्षी जगाला सुमारे २,७०० टन सोन्याचे उत्पादन होते.जर जगाच्या सोन्याची गरज भागवण्यासाठी दररोज सुमारे ३० कोटीहून अधिक जुने मोबाईल फोन रिसायकल करत बसावे लागेल.

6 / 6

त्यामुळे सध्या जगभरात वापरात असलेले अंदाजे सात अब्ज मोबाईल फोन दररोज रिसायकल केले तर अवघ्या २३ दिवसांत हा मोबाईलचा साठा संपेल.- इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू वापरलेले असतात. त्यामुळे जुन्या मोबाईल फोनचा कचरा म्हणून नाश करण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us