वडिलांकडूनच वाईट कृत्य, सर्वांसमोर मारझोड, त्याच अभिनेत्रीचा आज राजकारणातही बोलबाला

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहे, ज्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे खुश्बू सुंदर... आज खुश्बू दाक्षिणात्य सिनेविश्वातील फार मोठं नाव आहे. शिवाय त्या राजकारणात देखील सक्रिय आहेत.

| Updated on: Apr 18, 2025 | 1:13 PM
1 / 6
 खुश्बू सुंदर यांनी स्वतःला फक्त अभिनयापर्यंत मर्यादित ठेवलं नाही. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी राजकारणात देखील स्वतःची ओळख निर्माण केली. जे खुश्बू यांच्यासाठी बिलकूल सोपं नव्हतं...

2 / 6
 खुश्बू यांनी बालकलाकार  म्हणून स्वतःच्या करीयरची सुरुवात केली. 1980 मध्ये त्यांनी 'द बर्निंग ट्रेन' मध्ये काम केलं. त्यानंतर खुश्बू यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

3 / 6
आज खुश्बू फक्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री नाही तर, राजकारणात देखील सक्रिय आहेत. 2020 मध्ये अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला. राजकारणात देखील फार कमी कालावधीत त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलं.

4 / 6
खुश्बू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी नखत खान म्हणून एका मुस्लीम कुटुंबात जन्म घेतला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. ज्यासाठी जबाबदार स्वतः अभिनेत्रीचे वडील होते.

5 / 6
 एका मुलाखतीत खुश्बू यांनी धक्कादायक खुलासा केला. वयाच्या 8 व्या वर्षी अभिनेत्रीच्या वडिलांना तिच्यासोबत वाईट कृत्य केलं. वयाच्या 15 व्या वर्षी तिने या गुन्ह्याविरुद्ध आणि तिच्या वडिलांविरुद्ध आवाज उठवला.

6 / 6
 अभिनेत्रीने असेही सांगितले आहे की, तिच्या वडिलांचे वर्तन खूप अपमानास्पद होते. अभिनेत्रीचे वडील आईसह कुटुंबातील सर्वांना मारझोड करायचे. अभिनेत्रीच्या वडिलांनीही तिला सेटवर अनेकदा मारहाण केली आहे.