तुला डान्स जमणार नाही, फराह खानचं शब्द ऐकून विद्या बालनने या गाण्यावर केला असा डान्स की फराहची बोलती झाली बंद

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनना फराह खान म्हणालेली डान्स तुम्हारे बस की बात नाही. पण विद्या बालनने जेव्हा मंजुलिका बनून डान्स केला तेव्हा फराह खानला बसला धक्का. केलं प्रचंड कौतुक.

| Updated on: Mar 25, 2026 | 11:28 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अनेक यशस्वी चित्रपट देत इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.  मात्र, एक काळ असा होता की तिच्या डान्सिंग कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अनेक यशस्वी चित्रपट देत इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, एक काळ असा होता की तिच्या डान्सिंग कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

2 / 5

याच संदर्भात दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी एक रंजक आठवण सांगितली आहे. भूल भुलैया या चित्रपटातील ‘मेरे ढोलना’ हे गाणे विद्या बालनच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. या गाण्यातील तिच्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले.

3 / 5

एका मुलाखतीत प्रियदर्शन यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की लोकांना वाटायचं, विद्या बालन डान्स करू शकत नाही. पण विद्याने यालाच एक मोठं आव्हान म्हणून स्वीकारलं. या गाण्यासाठी तिने तब्बल 35 ते 40 दिवस कठोर सराव केला.

4 / 5

या गाण्यात तिच्यासोबत नृत्य करणारे विनीत राधाकृष्णन हे देशातील उत्कृष्ट शास्त्रीय नर्तकांपैकी एक आहेत. त्यांच्या जोडीने नृत्य करताना विद्याने त्यांची ऊर्जा पूर्णपणे जुळवून घेतली असे प्रियदर्शन यांनी सांगितले.

5 / 5

विद्या बालनने स्वतः प्रियदर्शन यांना सांगितलेला एक प्रसंगही त्यांनी शेअर केला. तिने सांगितले की, फराह खानने एकेकाळी तिला तू डान्स करू शकत नाहीस असे सांगितले होते. मात्र, ‘मेरे ढोलना’ पाहिल्यानंतर त्याच फराह खानने तिच्या कामाचे कौतुक केले. हा क्षण तिच्यासाठी अत्यंत खास आणि अविस्मरणीय ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us