टँकरच्या पाण्यावर भात पीक वाचवण्याची धडपड, शेतकरी राजा अडचणीत..
राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस राज्यात झाला नाही. त्यातच आता शेतकरी चिंतेत आहेत. पिके वाचवण्याचे मोठे आव्हान आज शेतकऱ्यांपुढे आले.
1 / 5

पालघर तालुक्यात पावसाने घेतलेल्या तीन आठवड्यांच्या विश्रांतीमुळे भात शेती संकटात सापडली आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याअभावी पीक करपण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
2 / 5
कुडे गावातील शेतकरी विकास पाटील यांनी चार हेक्टर क्षेत्रातील भात पीक वाचवण्यासाठी टँकरने पाणी आणून शेतात सोडले आहे.
3 / 5
काही ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध असलेल्या भागातून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या मदतीने पाणी शेतीपर्यंत पोहोचवून पीक वाचवण्याची धडपड सुरू आहे.
4 / 5
पावसाअभावी बळीराजावर अतिरिक्त खर्चाचा भार पडत असून, हातातोंडाशी आलेले भात पीक वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
5 / 5
राज्यात स्थिती बिकड आहे. पावसाने पाठ फिरल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यातच पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us