ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदारांचे फोटो लावत शेतकऱ्यांनी विचारला थेट जाब, ऊस..
ऊसाच्या दरात शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यातच आता धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. थेट एक बॅनरच शेतकऱ्यांकडून लावण्यात आले. या बॅनरवर आमदार खासदारांचे फोटो आहेत.

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे ऊसदराच्या प्रश्नावरून तेरणा पट्ट्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊस दराच्या बाबतीमध्ये उत्तर द्या! असा मजकूर लिहित खासदार आमदारांचे बॅनर ढोकी मध्ये झळकले आहेत.
मागील दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचा ऊसदरासाठी संघर्ष सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यातील ऊसदरात 700 ते 800 रुपयांचा फरक का?, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे ढोकी येथे जिल्ह्यातील खासदार आणि चार आमदारांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला असून, या प्रश्नाचे उत्तर द्या’ असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
ऊसदरातील तफावतीवर लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यात या बॅनरवर ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदारांचेही फोटो आहेत.
ऊसदराबाबात थेट शेतकरी राज्याच प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. आता हे बॅनर मोठ्या चर्चेचा विषय ठरल्याचे बघायला मिळतंय.