Photo Gallery : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पथनाट्य, आता तरी मिळेल का न्याय?

| Updated on: Mar 14, 2022 | 3:50 PM

अमरावती : लोकशाहीमध्ये न्याय मागण्याचा हक्क हा सर्वांनाच आहे. याकरिता आंदोलन, मोर्चे हे पर्याय असूनही प्रशासानाला घाम फुटत नाही. असाच काहीसा प्रकार विदर्भातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे. 2013 च्या कायद्यानुसार प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. याकरिता विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर मागील 12 दिवसांपासून लाक्षणीय प्राणांतिक महाउपोषण सुरू आहे. असे असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पथनाट्यातून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

1 / 4
मोबदल्या अभावी काय हाल: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या शेतजमिनीचा अजूनही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे उपसामारीचे वेळ आल्याचे हे पथनाट्यातून सांगण्यात आले आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचे हाल काय याचे दर्शन या पटनाट्यातून घडवून आणण्यात आले आहे.

2 / 4
वाढीव मोबदल्याचा प्रश्न : ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्रकल्प उभारणीसाठी घेण्यात आल्या आहेत. त्या बदल्यात 2013 च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्याची तरतूद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, 12 दिवसांतरही तोडगा निघालेला नाही.

3 / 4
कलाकरांना वेधले लक्ष : शेतकऱ्यांना रोजच्या जीवनात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पथनाट्यातून मांडण्यात आले आहे. भर उन्हात पटनाट्य आणि समोर शेतकऱ्यांची गर्दी. त्यामुळे आता तरी मागण्या मान्य होतील का हे पहावे लागणार आहे.

4 / 4
विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 12 दिवसांपासून लाक्षणीय प्राणांतिक महाउपोषण सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यासह इतर भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. वाढत्या उन्हामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.