
मेथीतील फाइटोएस्ट्रोजेन घटक महिलांचे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. पीरियड्स अनियमित असणे, मूड स्विंग्स, PCOS यांसाठी मेथीचे दाणे अत्यंत उपयुक्त आहे.

पाळीदरम्यान होणारा त्रास देखील मेथी दाण्यांमुळे कमी होतो. मेथीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे डोकं दुखणे, पोटदुखी या त्रासात आराम मिळतो.

मेथी स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी milk production वाढवणारे (galactagogue) म्हणून प्रसिध्द आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मेथीचं सेवन करावं. मेथी पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते आणि मेटाबॉलिझम वाढवते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मेथीतील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा तेज वाढवतात, पिंपल्स कमी करतात आणि केस गळणे/कोंडा कमी करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतात, ज्यामुळे रक्तातील साखर संतुलित राहते.

PCOS मधील इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करण्यासही मदत. मेथी फायबरने समृद्ध असल्याने अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास कमी करण्यास मदत करते. मेथीचे महिलांच्या आरोग्यास अत्यंत फायदेशीर आहे.