
गेले अनेक दिवस उत्कृष्ट शिक्षक असलेले डिसले गुरुजी चर्चेत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांचं कौतुक होतंय. आता रणजित सिंह डिसले गुरुजींनी ‘अखेर ती माझ्या जीवनात माझ्या घरी आलीच…’ अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

या ट्विटनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय. सोबतच डिसले गुरुजी कोणाबद्दल बोलत आहेत याची उत्सुकतासुद्धा काहींना होती.

तर काही दिवसांपूर्वी ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता अखेर डिसले गुरुजींच्या हाती या स्पेशल पुरस्काराची ट्रॉफी आली आहे.

या पुरस्काराच्या ट्रॉफीसोबत फोटो शेअर करत डिसले गुरुजींनी आनंद व्यक्त केला आहे.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे ही गुरुजींसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून डिसले गुरुजींचं कौतुक होतंय.

एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजींच्या नावानं इटलीमध्ये स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे.