
वॉरेन बफे यांच्या मते, श्रीमंत होण्यासाठी बचतीची सवय महत्त्वाची ठरते. 10 हजार रुपये कमाई असेल तर 2 हजार रुपयांच्या बचतीची सवय लावा. कमाईतील 20 टक्के रक्कम बचत केल्यास पैसा वाढेल.

दुसरा गुंतवणूक करतोय म्हणून तुम्ही सुद्धा तोच मार्ग अनुसरू नका. बाजाराची, गुंतवणुकीची माहिती घ्या. तज्ज्ञाचा सल्ला घ्या. मग गुंतवणूक करा.

स्वयंशिस्त, दीर्घकालीन गुंतवणूक रणनीती, जोखीम घेण्याची तयारी आणि नियमीत बचत या सवयी अंगी भिनवा. तरच तुम्हाला भविष्यात एक मोठी रक्कम उभारता येईल. एक फंड तयार करता येईल.

एकाच ठिकाणी तुमचा पैसा गुंतवू नका. तुमचा पोर्टफोलिओ डायवर्सिफाय ठेवा. अल्प, मध्यम आणि दीर्घ कालीन गुंतवणूक करा. विविध योजना आणि तुमची गरज यांची सांगड घाला. जास्त जोखीम घेऊ नका.

झटपट श्रीमंतीचा दावा करणाऱ्यांपासून, योजनांपासून चार हात दूर राहा. रात्रीतून कोणी श्रीमंत होत नाही. बफे यांच्या मते, योग्य ठिकाणी, योग्य रक्कम गुंतवा. त्यासाठी बाजाराचा अभ्यास करा. गुंतवणुकीचा फेर विचार करा.

अनावश्यक खर्च, वारेमाप उधळपट्टी, हॉटेलिंग, व्यसनं यापासून दूर राहा. तेव्हा पैसा वाचेल. त्याची बचत होईल. त्याची गुंतवणूक होईल. पैसा वाढेल. कमी वयात ही शिस्त लावल्यास वयाच्या 40 मध्येच तुमच्या गाठी मोठी रक्कम असेल.