
योगा करणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. योगाचा इतिहास सुमारे 5 हजार वर्ष जुना आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकते.

योग करणाऱ्या अनेकांना प्रश्न पडतो की, योगe करण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे का? याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या.

योगा करण्यापूर्वी आंघोळ करणे अजिबात आवश्यक नाही. पण योगा करण्यापूर्वी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगले आणि ताजेतवाने वाटेल.

यामुळे जर योगा करण्यापूर्वी आंघोळ केली तर फायदेशीर ठरते. मुळात म्हणजे अंघोळीच्या अगोदर किंवा नंतर योगा करा. योगा केल्याने मन प्रसन्न राहते.

योगा केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. यामुळे थोडावेळ काढून योगा करा.