
उमंग अॅप हे एक मोबाइल अॅप आहे जे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर प्रदान करते. उमंग अॅपच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, पेट्रोल बुकिंग, ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रेन तिकीट बुकिंग इत्यादी अनेक कामे करू शकता.

डिजीलॉकर अॅप: या अॅपमध्ये तुम्ही सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. या अॅपमध्ये तुम्ही मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि मार्कशीट यांसारखी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात एकत्रित ठेवू शकता.

एमपासपोर्ट सेवा: या सरकारी मोबाईल अॅपद्वारे पासपोर्टशी संबंधित सर्व कामे ऑनलाइन करता येतात. या अॅपच्या मदतीने तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. तसेच पासपोर्टची स्थिती तपासता येते.

एम-परिवहन: या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांची माहिती मिळवू शकता. व्हर्च्युअल आरसी, व्हर्च्युअल डीएल, डुप्लिकेट आरसी, मालकी हस्तांतरण, इतर बरीच कागदपत्रं ठेवू शकतात.

एम आधार: या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करणे, तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करणे, आधार पडताळणी करणे आणि तुमचा ईमेल/मोबाइल पडताळणी करणे यासारख्या गोष्टी सहजपणे करू शकता. तुम्ही हे अॅप्स गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.