
सैफ अली खान याच्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आरोपी मुळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, भारतीय कागदपत्र मिळवून देण्यास आरोपीची कोणी मदत केली? याची देखील सखोर चौकशी करण्यात येणार आहे.

तिसरा मुद्दा - आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे.

चौथा मुद्दा - आरोपी पाच महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सुरुवातीला मुंबईत राहिला. त्यानंतर मुंबईतील शहरांमध्ये देखील आरोपी राहिला होता...

पाचवा मुद्दा - आरोपीचा पूर्वी कोणताही रेकॉर्ड नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे.