2027 मध्ये इलेक्ट्रिक SUV चा धमाका! महिंद्रा थारपासून टाटा नेक्सॉनपर्यंत, येणार 5 दमदार गाड्या

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असताना 2027 मध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. महिंद्रा, टाटा, होंडा, रेनो आणि विनफास्ट या कंपन्या नव्या इलेक्ट्रिक SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये महिंद्रा थार इलेक्ट्रिक आणि नव्या जनरेशनच्या टाटा नेक्सॉन EV कडे विशेष लक्ष लागलं आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 10:33 PM
1 / 5
महिंद्रा थार इलेक्ट्रिक: 2027 मध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पैकी महिंद्रा थार इलेक्ट्रिक एक आहे. व्हिजन टी कॉन्सेप्टनंतर ही गाडी टेस्टिंगदरम्यानही दिसली आहे. NU_IQ आर्किटेक्चरवर आधारित या SUV मध्ये थारसारखे उंच आणि मस्क्युलर डिझाइन पाहायला मिळणार आहे.

महिंद्रा थार इलेक्ट्रिक: 2027 मध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पैकी महिंद्रा थार इलेक्ट्रिक एक आहे. व्हिजन टी कॉन्सेप्टनंतर ही गाडी टेस्टिंगदरम्यानही दिसली आहे. NU_IQ आर्किटेक्चरवर आधारित या SUV मध्ये थारसारखे उंच आणि मस्क्युलर डिझाइन पाहायला मिळणार आहे.

2 / 5

नेक्स्ट जनरेशन टाटा नेक्सॉन EV: टाटा मोटर्स लोकप्रिय नेक्सॉन EV चे नवीन जनरेशन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. 'गरुड' असे या मॉडेलचे कोडनेम आहे. 2027 मध्ये येणाऱ्या या SUV चा मागील भाग अधिक बॉक्सी असू शकतो. तसेच नवीन डॅशबोर्ड आणि आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

3 / 5

होंडा अल्फा: होंडाची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक SUV बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील टपूकडा प्लांटमध्ये या गाडीचे उत्पादन केले जाणार आहे. कूपेसारखी स्पोर्टी रूफलाइन असलेल्या या SUV मध्ये 65kWh ते 75kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे.

4 / 5

रेनो ब्रिजर EV: रेनोची ब्रिजर EV 2027 च्या अखेरीस भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या या SUV मध्ये 200mm ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच 35kWh आणि 55kWh अशा दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळू शकतात.

5 / 5

विनफास्ट VF5: व्हिएतनामची इलेक्ट्रिक वाहन कंपनी विनफास्ट भारतात आपली किफायतशीर इलेक्ट्रिक SUV VF5 आणण्याच्या तयारीत आहे. या गाडीच्या फेसलिफ्ट मॉडेलचे डिझाइन पेटंट समोर आले आहे. यात 29.6kWh आणि 37.23kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळू शकतात. एका चार्जमध्ये 326 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us