
मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.

अल्प कालावधीसाठीही ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेसह योग्य परतावाही मिळतो. सध्या अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला सहा महिन्यांच्या एफडीवर चांगला व्याज देतात.

बँक ऑफ बडोदा ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेच्या गुंतवणूकवर 6 महिन्यांसाठीच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5 टक्के आहे. त्याशिवाय दुसरीकडे, इंडसइंड बँक ही 2 कोटी रुपयांच्या एफडीवर 6 महिन्यांसाठी 4.50 टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर 5 टक्के इतका आहे. या दरम्यान जर तुम्ही 6 महिन्यांसाठी 1 ते 5 कोटी रुपयांची एफडीवर premature withdraw या तत्त्वावर घेतली तर तुम्हाला 4.35 टक्के व्याज मिळतो.

कॅनरा बँक हा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेसाठी 6 महिन्यांच्या एफडीवर 4.45 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 4.95 टक्के आहे. तर बंधन बँक 6 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5.25 टक्के आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी 6 महिन्यांच्या एफडीवर दरवर्षाला 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5 टक्के आहे. तर आरबीएल बँक अशा एफडीवर आपल्या ग्राहकांना 4.75 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याज दर 5.25 टक्के आहे.


तर डीसीबी बँक ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कमेवर 6 महिन्यांच्या एफडीसाठी सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेत 6 महिन्यांच्या एफडीसाठी 5.70 टक्के दराने व्याज दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा हाच दर 6.20 टक्के आहे.