
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व्यक्ती समाजात मानसन्मान आणि भौतिक सुख उपभोगतो. त्यामुळे गरीबी असलेला व्यक्ती कायम पैसे कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. यासाठी चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

पैसा कमवण्याच्या हेतुने प्रत्येक जण परिश्रम करत असतो. पण अनेकजण शॉर्टकटने पैसा कमवू इच्छितात. पण या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे सातत्यपूर्व कठीण परिश्रम केल्याने नक्कीच यश मिळतं.

गरीबीत शिक्षणाला महत्त्व दिलं तर प्रत्येक समस्येचं भविष्यात निराकरण होतं. एक शिक्षित व्यक्ती स्वत:सोबत कुटुंबाला पोसण्याची ताकद ठेवतो.

कोणत्याही नातं हे विश्वासावर टिकतं. पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर या दोघांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर संशयाचं वातावरण निर्माण झालं नातं तुटतं.

नातं दीर्घकाळ टिकावं यासाठी जोडीदाराला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या नात्यात बंधनं असतात अशी नाती टिकत नाहीत. तसेच काही ना काही कारणावरून वाद होतात.