तुकाराम मुंढे यांचा नागरिकांना मोठा सल्ला, हॉटेलमध्ये जेवायला जाताना या 4 गोष्टी पाळण्याचे आवाहन..

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या कारभार हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अनेक रेस्टारंटचे परवाने रद्द करण्यात आली. त्यामध्येच आता तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना मोठ्या सूचना दिल्या आहेत.

| Updated on: Aug 17, 2026 | 9:06 AM
1 / 5
अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत.मोठ्या कारवाया केल्या जात आहेत.अनेक हॉटेलचे परवाने तुकाराम मुंढे यांच्याकडून रद्द करण्यात आलीत. भेसळयुक्त,दूध,तूप,पनीर,दही,गुटखा यावर मोठी कारवाई केली जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत.मोठ्या कारवाया केल्या जात आहेत.अनेक हॉटेलचे परवाने तुकाराम मुंढे यांच्याकडून रद्द करण्यात आलीत. भेसळयुक्त,दूध,तूप,पनीर,दही,गुटखा यावर मोठी कारवाई केली जात आहे.

2 / 5

गुटखा विक्रीपर्यंतच आपली कारवाई एफडीएने मर्यादित ठेवली नाही.भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. देशभरातून तुकाराम मुंढे यांचे काैतुक केले जात आहे. तुकाराम मुंढे यांच्यासाठी अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या.

3 / 5

तुकाराम मुंढे यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला एका मुलाखत दिली.या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की,मी रेस्टारंटमध्ये शक्यतो जेवायला जात नाही.मला घरचे साधे जेवण आवडते.मी माझ्या आवडची पदार्थ कधी कधी खातो.

4 / 5

यादरम्यान रेस्टारंटमध्ये जेवणासाठी जाणाऱ्या नागरिकांना तुकाराम मुंढे यांनी मोठा सल्ला दिला तुकाराम मुंढे यांनी म्हटले की,नागरिक ज्यावेळी हॉटेलमध्ये खाण्यासाठी जातात,त्यावेळी त्यांनी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छता तपासली पाहिजे.

5 / 5

तुम्ही जिथे जेवणासाठी जात आहेत,ते हॉटेल, रेस्टारंट परवानाधारक आहे का? हे तपासा.लोकांनी जास्त खारट,जास्त फॅटयुक्त आणि गोड पदार्थांचे सेवण टाळावे.अशा पदार्थ कधीतरी खाणे ठीक आहे. पण दररोज अजिबात नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us