
'कबीर सिंग'च्या अभूतपूर्व यशानंतर आता अभिनेता शाहिद कपूर आणखी एका तेलुगू रिमेकमध्ये झळकणार आहे.

त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव 'जर्सी' असं असून त्यानं या चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे.

या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी त्यानं मेहनत घेऊन आपल्या लूकवर काम केलं आहे.

सोबतच त्यानं क्रिकेटच्या सरावालासुद्धा सुरुवात केली आहे. त्याने या सरावाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'जर्सीच्या सरावासाठी.... दे दणादण' असं कॅप्शन त्यानं शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.

या फोटोमध्ये शाहिदचा लूक हा 'कबीर सिंग'मधील कबीरसारखाच आहे.

हातात ग्लोव्ह्ज आणि क्रिकेटचं साहित्य घेऊन शाहिद या फोटोमध्ये दिसत आहे.