
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. दादरमधील त्यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावत त्यांच धरपकड सुरू केली आहे. कोणत्याही मस्जिदच्या 100 मीटर अंतराच्या आत महाआरती आयोजित करू नये, असेही सांगण्यात आले आहे.