PF Withdrawal : बँक अकाऊंट, आधार ते पॅन, PF काढताना या चुका टाळा, अन्यथा क्लेम होईल रिजेक्ट; वाचा काय काळजी घ्यावी?
EPFO खात्याशी लिंक असलेला आधार क्रमांक आणि त्यावरील नाव योग्य आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे PAN क्रमांक आणि नावातील माहितीही EPFO रेकॉर्डशी जुळली पाहिजे. वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये माहिती वेगळी असल्यास पडताळणीला विलंब होऊ शकतो.

PF काढण्यासाठी क्लेम दाखल करण्यापूर्वी UAN प्रोफाइलमधील नाव, जन्मतारीख आणि इतर वैयक्तिक माहिती तपासा. ही माहिती आधार आणि PAN कार्डवरील तपशीलाशी जुळणे महत्त्वाचे आहे. नाव किंवा जन्मतारखेत तफावत असल्यास क्लेम प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे चूक आढळल्यास आधी ती दुरुस्त करून घेणे फायदेशीर ठरेल.
EPFO खात्याशी लिंक असलेला आधार क्रमांक आणि त्यावरील नाव योग्य आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे PAN क्रमांक आणि नावातील माहितीही EPFO रेकॉर्डशी जुळली पाहिजे. वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये माहिती वेगळी असल्यास पडताळणीला विलंब होऊ शकतो. त्यामुळे क्लेम करण्याआधी सर्व तपशील एकसारखे असल्याची खात्री करा.
PFची रक्कम EPFO शी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होत असल्याने बँकेचा तपशील बरोबर असणे गरजेचे आहे. क्लेम करण्यापूर्वी खाते क्रमांक, IFSC कोड आणि खाते सक्रिय आहे का हे तपासा. बँक खाते योग्य पद्धतीने EPFOशी लिंक असणे गरजेचे आहे. चुकीच्या बँक तपशीलामुळे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.
UANमध्ये नोकरी सुरू केल्याची आणि नोकरी सोडल्याची तारीख अचूक नोंदली आहे का, हेही पाहा. रोजगाराच्या रेकॉर्डमधील चुकीची माहिती क्लेमच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. त्यामुळे PF काढण्यापूर्वी EPFO प्रोफाइलमधील रोजगाराशी संबंधित तपशील तपासून घ्या.
(या स्टोरीतील माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा. )