Divya Mittal : आधी राजीनामा, आता माजी IAS अधिकारी मित्तल यांचं नवं मिशन, फेसबुक पोस्टची देशात चर्चा!
माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या पोस्टने त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेश कॅडरच्या माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सरकारी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान दिव्या मित्तल यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिव्या मित्तल यांनी येत्या दोन दिवसांत आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
दिव्या मित्तल यांनी पोस्टमध्ये भविष्यात काय करणार, याचे संकेत दिले आहेत. 'मुलं लहान आहेत. आता घर. पॅकेज चांगलं मिळाल्यावर परदेशातही जाईल. आयएसवर पुस्तक लिहिलं आहे. मग कोचिंग. तिकीट कन्फर्म झालं असेल, तर राजकारण. 29 सप्टेंबर, सकाळी 8.30 वाजता सांगेल'. दिव्या मित्तल सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या तीन सोशल अकाऊंटवर चांगल्याच सक्रिय असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर 3.69 लाख, एक्स (ट्विटर) वर 2.33 लाख आणि फेसबुकवर 1.53 लाख फोलोअर्स आहेत.
2013 बॅचच्या उत्तर प्रदेश कॅडरच्या IAS दिव्या अधिकारी यांनी 30 ऑगस्ट रोजी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. नोकरीचा राजीनामा देताना त्यांनी वैयक्तिक कारण दिले होते. त्यानंतर प्रशासनाने राजीनामा स्वीकारला. राजीनामा दिल्यानंतर दिव्या मित्तल यांनी म्हटलं होतं की, आयएएस नोकरी आयुष्यातील सर्वात मोठा धडा होता. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कुटुंब, लेखन, कोचिंग, समासेवेचे देखील संकेत दिले आहेत.
दिव्या मित्तल यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम बंगळुरू येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये नोकरी केली.
पुढे यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून भारतात परतल्या होत्या. त्यांनी प्रशासनात 13 वर्ष सेवा केली. मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.