Vaibhav Sooryavanshi : संजय मांजरेकरला मानलं, जे चुकतय ते थेट वैभव सूर्यवंशीला बोलण्याची हिम्मत दाखवली, तुला आदर हवा ना, मग..
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं, तेव्हा त्याचं वय फक्त 13 वर्ष होतं. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये डेब्यु केला. पहिल्याच सीजनमध्ये 35 चेंडूत शतक झळकवून वैभवने इतिहास रचला. हा त्याचा दुसरा सीजन आहे. आधी तो त्याच्या वयामुळे चर्चेत आला. पण आता स्फोटक आक्रमक फलंदाज म्हणून त्याने त्याची ओळख प्रस्थापित केली आहे.

आज वैभव सूर्यवंशीला मोठमोठे गोलंदाज बॉलिंग करायला घाबरतात. अशी दहशत त्याने आपल्या फलंदाजीने निर्माण केली आहे. जसप्रीत बुमराह असो वा जोश हेझलवूड वैभवने यांची गोलंदाजी फोडून काढलीय. बुमराहला तर पहिल्या चेंडूवर सिक्स मारला होता. आज वैभव सूर्यवंशीचा मोठा चाहता वर्ग तयार झालाय.

IPL 2026 संपल्यानंतर आयर्लंड टूरसाठी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड होऊ शकते असं बोललं जातय. जर, त्याची निवड झाली तर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू असेल. सध्या हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

माजी क्रिकेटपटू, क्रिकेट विश्लेषक संजय मांजरेकर यांच्या मते वैभव इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे. पण तो सध्या फक्त 20 फॉर्मेटसाठी योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वैभवला स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अजूनही काही ठिकाणी काम करावं लागेल असं संजय मांजरेकर यांना वाटतं.

सध्या सगळेच जण वैभव सूर्यवंशीचं नुसतं कौतुक करतायत. पण संजय मांजरेकर यांनी वैभवच्या खेळातली त्रुटी दाखवून दिली. त्याची कमकुवत बाजू जी आहे, त्यावर ते बोलले. वैभवला फक्त टी 20 क्रिकेट खेळायचय. पैसा कमावायचाय मग ठीक आहे. पण टीकाकारांनी तुम्हाला आदर द्यावा असं वाटत असेल तर तुला चेंडूच्या लाइनमध्ये येऊन खेळाव लागलं.

वैभव सूर्यवंशीच प्रदर्शन लक्षात घेता तो टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावेदार नक्कीच आहे. आयपीएल आणि SMAT मधील त्याचं प्रदर्शन पाहता तो तयार आहे. पण शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल सारखे ओपनर्स असताना टीममध्ये जागा मिळवणं त्याच्यासाठी सोपं नसेल. वैभवला वनडे, टेस्ट फॉर्मेटमध्ये खेळायचं असेल तर आपल्या टेक्निकमध्ये काही बदल करावे लागतील असं मांजरेकर म्हणाले.