हिरॉईन नव्हे व्हिलन.. नकारात्मक भूमिका करून या अभिनेत्री चर्चेत, तिसरं नाव वाचाल तर…

हिंदी चित्रपटांमध्ये नायक-नायिकेला जितके महत्व दिले जाते, तितकेच महत्व खलनायकाच्या भूमिकेला जाते. आता काळ बदलला आहे आणि आता केवळ हिरोच नाही तर अनेक अभिनेत्रीही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसतात. आज महिला दिनानिमित्त अशा 5 बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी चित्रपटांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आणि चर्चेत राहिल्या.

| Updated on: Mar 08, 2025 | 2:26 PM
1 / 5
काजोल -   90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या काजोलने त्या काळातील सर्वात रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करून सर्वांना वेड लावले. पण ती चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही तितक्याच चांगल्या प्रकारे साकारेल, असे कुणालाही वाटले नव्हते. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुप्त' या थ्रिलर चित्रपटात काजोलने ईशा नावाच्या मुलीची नकारात्मक भूमिका साकारली होती, जिच्यावर अनेक लोकांची हत्या केल्याचा आरोप असतो. चित्रपटातील तिची भूमिका इतकी डॉमिनेंटिग होती की तिने चित्रपटातील प्रमुख कलाकार बॉबी देओल आणि मनीषा कोईराला यांनाही मागे टाकलं. तिची सर्वाधिक चर्चा झाली.

2 / 5
प्रियांका चोप्रा -  ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा ही प्रेक्षकांच्या आवडत्या स्टार्सपैकी एक आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट असो किंवा बॉलीवूड चित्रपट, लोकांना तिचं काम खूप आवडतं. अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात ‘द हिरो’ या चित्रपटातून केली होती. 'ऐतराज'मध्ये नकारात्मक भूमिका करूनही प्रियांकाने लोकांची मने जिंकली होती. तिने या चित्रपटात सहाय्यक पण नकारात्मक भूमिका केली होती, परंतु ती इतकी ताकदवान होती की तिने अक्षय कुमार आणि करीना कपूर या प्रमुख कलाकारांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली.

3 / 5
ऐश्वर्या राय -  या यादीत पुढचे नाव आहे राजकुमार संतोषी यांच्या 'खाकी' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या रायचे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने इतर कोणत्याही चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली नाही. लोकांनी तिच्या अभिनयाचे आणि व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक केले. लोकांनी तिच्या अभिनयाचे आणि व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, अजय देवगण, अक्षय कुमार आणि तुषार कपूर हे देखील मुख्य भूमिकेत  होते.

4 / 5
बिपाशा बसू  -  बिपाशा बसूने आता चित्रपटांपासून दूर गेली असली तरी तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. बिपाशा बसूने चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीपासून ते खलनायकापर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत.‘जिस्म’ चित्रपटात ती निगेटीव्ह भूमिकेत दिसली.

5 / 5
उर्मिला मातोंडकर  -  उर्मिला मातोंडकरही सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा तिचे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी हिट लिस्टमध्ये सामील व्हायचे. या अभिनेत्रीने ‘प्यार तूने क्या किया’ आणि ‘एक हसीना थी’ या चित्रपटांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपट हिट झाले नाहीत, पण उर्मिलाचे पात्र आणि तिचा अभिनय खूप आवडला.