
सिंगल राहूनही आयुष्यीच मजा लुटता येते, बऱ्याच जणांना हे वाचायला विचित्र वाटेल, पण आनंदी राहण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी दर वेळेस कोणत्या तरी व्यक्तीची गरज लागतेच असं नाही. बॉलिवूडमध्ये अनेस अनेक जे सेलिब्रिटी आहेत जे प्रचंड प्रसिद्ध आहेत. पैसा, प्रसिद्धी, स्टारडम, आलिशान आयुष्य , सगळं आहे त्यांच्याकडे पण वयाची 40-50 वर्ष उलटूनही ते अद्याप अविवाहीत आहेत. ते अनेकदा प्रेमात पडले, पण त्यांनी अद्यापही लग्न केलेलं नाही. एकटं राहूनच ते त्यांचं आयुष्य जगत आहेत. कोण आहे ते सेलिब्रिटी जाणून घेऊया.

सलमान खान - बॉलीवूडमधील सिंगल अभिनेत्याबद्दल बोलायचंतर सलमान खानचे नाव या यादीत सर्वात वर आहे. 59 वर्षांच्या सलमानमध्ये असा स्वॅग आहे की तरुण कलाकारांचे आकर्षण त्याच्या आकर्षणासमोर फिके पडते. सलमानने ऐश्वर्या, कतरिना सारख्या अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. पण तो आतापर्यंत कोणासोबतही सेटल झालेला नाही, त्याने लग्नच केलेलं नाही.

तब्बू - प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी, नामवंत अभिनेत्री तब्बू ही 53 वर्षांची आहे आणि ती अजूनही अविवाहित आहे. प्रेमात तब्बूचे मन अनेक वेळा तुटले आहे. वृत्तांनुसार, तब्बूने दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनला 0 वर्ष डेट केलं पण त्यांचं नातं पुढे गेलं नाही. तब्बू अजूनही अविवाहित आहे.

अक्षय खन्ना - दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना हा देखील आनंदाने अविवाहित असलेल्यांच्या यादीत समाविष्ट आहे. अक्षय खन्ना सिंगल असूनही, तो त्याचे आयुष्य चांगल्या प्रकारे एन्जॉय करत आहे.

दिव्या दत्ता - अभिनेत्री दिव्या दत्ता 47 वर्षांची झाली आहे. मात्र ती अजूनही अविवाहित आहे. लग्नाबद्दल विचारले असता दिव्या म्हणाली की, तिला लग्न करायचं नाही असे नाही. पण ती अजूनही योग्य जोडीदाराच्या शोधात आहे.

अमिषा पटेल - 50 वर्षांची अभिनेत्री अमिषा पटेल ही दिग्दर्शक विक्रम भट्ट याच्या प्रेमात डली, तेव्हा तिने तिच्या कुटुंबाविरुद्ध बंडखोरी केली होती. नंतर अमिषाने विक्रमशी संबंध तोडले. विक्रमनंतर, बिझनेसमन कणव पुरी अमिषाच्या आयुष्यात आला. पण 2010 मध्ये, अमिषा कणवपासूनही वेगळी झाली. तेव्हापासून, अमिषा अविवाहित आहे.

सुष्मिता सेन - मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता सेन आता 49 वर्षांची आहे. ती बऱ्याच काळापासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती, नंतर ते वेगळेही झाले. पण सुष्मिताचा सध्या लग्न करण्याचा कोणताही इरादा नाही.

उदय चोप्रा - दिग्दर्शक यश चोप्रा यांचा धाकटा मुलगा उदय चोप्रा यानेही चित्रपटांमध्ये नशीब आजमावले पण तो यशस्वी होऊ शकला नाही. मोहब्बतें या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या उदय चोप्राचेही अद्याप लग्न झालेले नाही.

तनीषा मुखर्जी - अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी 47 वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. तनिषाचे नाव उदय चोप्रा आणि अरमान कोहलीशी जोडले गेले होते पण ती कोणासोबतही सेटल झाली नाही.

राहुल बोस - नामवंत अभिनेता राहुल बोसहा देखील अजूनही अविवाहित आहे. 57 वर्षीय राहुल लग्नापासून दूर राहू इच्छितो. तो जीवनसाथीशिवाय मुक्तपणे आपले आयुष्य जगतोय.

तुषार कपूर - अभिनेता तुषार कपूर देखील अद्याप विवाहित नाही. एक काळ असा होता जेव्हा तुषारचे नाव त्याच्या सह-अभिनेत्रींशी जोडलं जायचं पण तुषारच्या आयुष्यात कोणत्याही मुलीने जीवनसाथी म्हणून प्रवेश केला नाही. तुषार 48 वर्षांचा आहे आणि तो सरोगसीद्वारे एका मुलाचा पिता झाला आहे.

एकता कपूर - तिचा धाकटा भाऊ तुषार कपूर प्रमाणे, एकता कपूरलाही तिच्या आयुष्यात कधीही जीवनसाथीची कमतरता जाणवली नाही. 50 वर्षीय एकता आनंदाने अविवाहित आहे आणि आता ती सरोगसीद्वारे एका मुलाची आई देखील झाली आहे.