
साऊथ सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत ण यशच्या आधीच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मोठ्या पडद्यावर,ऑनस्क्रीन इंटिमेट सीन दिले आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, यशचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, माझे पालक पाहू शकणार नाहीत अशी दृश्य कधी साकारणार नाही, असं त्याने म्हटलं होतं.

म्हणजेच पूर्वी यश इंटिमेट सीन्स टाळत असे, पण टॉक्सिकसाठी त्याने त्याचे जुने नियम मोडले. पण नो किसींग किंवा नो इंटिमेट सीन पॉलिसी तोडणारा यश हा काही पहिला अभिनेता नाही.

यशच्या आधी अनेक स्टार्सनी चित्रपटांसाठी स्वतःचे नियम मोडले आहेत. तमन्ना भाटियाने लस्ट स्टोरीज 2 मध्ये विजय वर्मा याला किस करून १८ वर्षांची तिची पॉलिसी मोडली होती.

किंग खान हा रोमान्सचा बादशाह मानला जातो, मात्र त्याने कधी कोणत्याच अभिनेत्रीला ऑनस्क्रीन किस केलं नव्हतं. पण 'जब तक है जान'मध्ये त्याने कतरिनासोबत किसिंग सीन दिला बोता. तसेच 'जब हैरी मेट सेजल'मध्येही त्याने अनुष्काला किस केल होत, चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता.

तर 29 वर्षांच्या नो-किस पॉलिसीनंतर, काजोलने ओटीटी शो "द ट्रायल" साठी ती पॉलिसी मोडली कारण त्या दृश्याची गरज होती.

शाहिद कपूर हा अशा स्टार्सपैकी एक आहे ज्यानेही नो-किस पॉलिसी मोडली आहे. "कबीर सिंग" चित्रपटात कियारा अडवाणीसोबतच्या त्याच्या किसिंग सीनने सर्वांनाच धक्का बसला.

रितेश देशमुख पडद्यावर चुंबन दृश्ये टाळतो. पण, त्याने त्याच्या 'वेदा' चित्रपटात त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाला किस केलं होतं.

अजय देवगणने त्याच्या "शिवाय" चित्रपटात नो किस पॉलिसीचे उल्लंघन केले. या चित्रपटात त्याने एरिका करसोबत एक इंटिमेट सीन दिला होता, ज्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.