लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले, नेत्यांच्या प्रचाराला दणक्यात सुरूवात

| Updated on: Apr 05, 2024 | 3:37 PM

लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांची उमेदवारी यादी देखील जाहीर झाली आहे. राज्यातील विविध नेत्यांनी प्रचाराला दणक्यात सुरूवात झाली आहे.

1 / 6
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केला. त्यांच्या नामांकन रॅली दरम्यान मोठा जनसमुदाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमला.

2 / 6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे या बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. त्यांनीही प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली आहे. बारामतीमध्ये यंदा सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे.

3 / 6
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत.  त्यांच्या जनसंवाद यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्यांचा प्रचारही धडाक्यात सुरू आहे.

4 / 6
भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचे आव्हान असेल.

5 / 6
अमरावतीतून भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी अमरावतीमध्ये महायुतीची रॅली आयोजित करण्यात आली होती.

6 / 6
नांदेड लोकसभा भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता भाजपाची जाहीर सभा झाली. त्यावेळी चिखलीकर यांच्या प्रचारासाठी खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.