
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. तेसच, यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती पाहायला मिळत आहे. कोणी एम सीलपालसून गणेशाची मूर्ती साकारली आहे तर कोणी इको फ्रेंडली गणपती साकारला आहे, तर कोणी चक्क काडीपेटीतल्या काड्यांपासून गणेशाची मनमोहक मूर्ती बनवली आहे. पाहुयात असेच काही खास आणि वेगळे गणपती

मुंबईतील अक्षय चिलवंत या तरुणाने चक्क एम सीलपासून आकर्षक अशी गणेशाची मूर्ती साकारली आहे.

तर ओदिशा येथील पुरी येथे राहणाऱ्या सास्वत साहू या कलाकाराने काडीपेटीतल्या काड्यांपासून गणेशाची मनमोहक मूर्ती साकारली आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी, नागपुरात बाप्पांची मूर्ती आणि मुशकालाही मास्क लावण्यात आलाय.

नाशिकच्या रविवार कारंजा वरील प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात आकर्षक रोषणाई करुन बाप्पा समोर आकर्षक सजावट करण्यात आलीये.

लुथियानामध्ये इको फ्रेंडली गणपती साकारण्यात आला आहे. यावेळी 200 किलो बेल्जियन डार्क चॉकलेटचा वापर करुन गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे.

नांदेडच्या तामसा गावांत पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध अन्नधान्य आणि पर्यावरण पूरक वस्तूपासून सहभागी स्पर्धकांनी गणपती बाप्पाच्या मुर्त्या बनवण्यात आल्या. राजुसिंग चोव्हान यांनी घेतलेल्या या स्पर्धेत बनवलेले गणपती नागरिकांना घरी स्थापनेसाठी भेट देण्यात आले.