
शंकराला तुळस वाहत नाही हे तुम्हाला माहित असेल. पण तुम्हाला हे माहित आहे का, गौरी पुत्र श्री गणेशाला सुद्धा तुळस वाहत नाही. भगवान गणेश पूजेत तुळशीचा वापर पूर्णपणे वर्जित आहे. याच्यामागे कारण आहे एक शाप.

भगवान गणेशला तुळस का वाहत नाही? याला कारण आहे, गणेशाने तुळशीला दिलेला शाप. एकदा गणेशजीनी तुळशीला शाप दिलेला. त्यानंतर पूजेमध्ये कधी तुळशीचा वापर केला जात नाही.

एक पौराणिक कथा आहे, त्यानुसार गणेशजी तपस्या करत होते. त्यावेळी तिथून जाणारी तुळस भगवान गणेशाकडे आकर्षित झाली. तिला त्यांच्यासोबत विवाह करायचा होता. तुळशी देवीने गणेशाकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला.

श्री गणेशाने तुळशीचा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे तुळशी क्रोधित झाली. तिने गणेशाला शाप दिला की, तुमचे दोन विवाह होतील. त्यावेळी गणेशाने सुद्धा तुळशीला शाप दिला की, तिचा विवाह एका असुराशी होईल.

गणपतीने दिलेल्या शापनंतर तुळशीने माफी मागितली. त्यानंतर गणपतीने तिला आशिर्वाद दिला की, त्या भगवान विष्णू आणि भगवान कृष्णाला प्रिय असतील. कलयुगात जीवनात मोक्षाच कारण बनतील. पण गणेश जींच्या पूजेमध्ये तुळशीचा उपयोग होणार नाही.