
गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. 7 सप्टेंबर , शनिवारी गणेश चतुर्थी असून लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण राज्य सज्ज झालं आहे.

गौरी-गणपती सण काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं , पुण्याच्या भोरमधील उत्रौलीच्या कुंभारवाड्यात, तसेच गणेश मूर्तीशाळांमध्ये कारागीरांची गणेश मूर्ती रंगवण्याची लगबग सुरू झाली आहे.

सर्व कारागीर गौरी गणपतीच्या सुबक मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यात दंग आहेत.

दरवर्षी या ठिकाणचे मूर्तिकार जवळपास 15 हजार गणेशमूर्ती आणि 40 हजार गौराई घडविण्याचे काम करीत असतात.

महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख शहरांसोबतच परदेशातही या मूर्त्यांना मोठी मागणी आहे.

यंदा रंग, कच्चा माल,इमिटेशन ज्वेलरी अशा सर्वच गोष्टी महागल्यानं, मूर्तीच्या किमतीतही 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.