
गौहरचा नवरा जैद दरबारने प्रेग्नेंट पत्नीच कौतुक केलं. तो म्हणाला की, "गौहर प्रत्येक गोष्ट परफेक्ट बॅलन्स करते. जैद म्हणाला की, ती माझी आई, स्वत:ची आई, मुलगा जेहान आणि माझे वडिल सगळ्यांना संभाळते"

फिल्मीज्ञानला दिलेल्या इंटरव्यूमध्ये तो म्हणाला की, "ती काम आणि फॅमेलीमध्ये बॅलन्स ठेवते. मी पण तिच्यासारखाच आयुष्यात गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो"

जैद म्हणाला की, "काम धंद्यावर असताना मी प्रेग्नेंट असतो, तर मला काम करणं झेपलं नसतं. कारण मला माहितीय, हे सोप्प नाही. मेंटली कठीण आहे"

"फिजिकली चला मी करुनही जाईन. पण मानसिक दृष्टया सोपं नाही. अशा प्रसंगी मला गौहरच सपोर्ट बनून रहायच आहे. प्रेग्नेंसीच्या काळात तिला समजून साथ देणं हे माझं कर्तव्य आहे"

गौहर खान आणि जैद दरबार आपल्या दुसऱ्या मुलाच्या स्वागताच्या वेलकमसाठी खूप उत्सुक आहेत. अभिनेत्री फौजी 2 च्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट झाली. या बातमीने तिच्या सहकलाकारांना सुद्धा आश्चर्याचा धक्का दिला होता.