
बॉलिवूडचा किंग खान, अभिनेता शाहरुख खानची बायको गौरी खाननं तब्बल 13 वर्षांपूर्वीचा जूना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गौरीनं शेअर केलेला हा फोटो 2007 मधील आहे. या फोटोसोबत तिनं 'ओहहह !!! हा लूक आठवतो का? स्टाइल 2007. माझं यावर प्रेम आहे '. असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोमध्ये गौरीनं प्रिंटेड निळ्या रंगाचा स्कर्ट आणि ग्रे रंगाचा टॉप परिधान केला आहे.

गौरीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शिवाय चाहत्यांकडून गौरीचं कौतुकही करण्यात येत आहे.

सोबतच गौरीनं शाहरुखसोबतचा एक जूना फोटोसुद्धा शेअर केला आहे.