
शुक्रवारी गौतम अदानी समूहातील कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. या समूहातील एक शेअर 60 रुपयांपेक्षा खाली आला. अमेरिकेत उद्योजक गौतम अदानी यांच्याविरोधात समन्स बजावण्यास मंजूरी द्यावी यासाठी न्यायपालिकेचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. फसवणूक आणि 26.5 कोटी अमेरिकन डॉलरच्या लाचेचं हे कथित प्रकरण आहे.

हे वृत्त समोर येताच अदानी समूहाला शेअर बाजारात झटका बसला. या समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर विस्कटले. बाजारात धराशायी झाले. यामध्ये सिमेंट व्यवसाय करणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे. सांघी इंडस्ट्रीजचा शेअर दणकावून आपटला आहे. हा शेअर 60 रुपयांच्या जवळपास आला आहे.

सांघी इंडस्ट्रीजचा शेअर 63.87 रुपयांहून खाली आला. हा शेअर 60 रुपयांच्या घरात आला. एक दिवसापूर्वी हा शेअर 5.40 टक्क्यांनी घसरून बंद झाला होता. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी ही 71.80 रुपये आहे. तर या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 50.10 रुपये इतका आहे.

न्यूयॉर्क येथील ब्रुकलिन येथील एका न्यायालयात गौतम अदानी आणि सागर अदानी यांना ईमेल मार्फत नोटीस पाठवण्यात यावी यासाठी मंजूरी देण्याची विनंती करण्यात आली आहे. सांघी इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर्सकडे 75 टक्के वाटा आहे. तर उर्वरित वाटा हा सार्वजनिक शेअरधारकांकडे आहे.

सांघी इंडस्ट्रीज कंपनीची बोर्ड मिटींग ही 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यामध्ये सरत्या वर्षातील समाप्त तिमाही आणि नऊ महिन्यातील आर्थिक ताळेबंदावर चर्चा होईल. तर काही निर्णयांना मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात या शेअरची घोडदौड समोर येईल.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.