Geely Battleship 700 SUV : ही कार पाण्यावरही धावते, 12 मिनिटांत 10 हजार बुकिंग्स! एकदा चार्ज केल्यावर.. किंमत किती?

चीनमध्ये Geely Battleship 700 SUV लॉन्च होताच अवघ्या 12 मिनिटांत तिच्या 10,000 हून अधिक ऑर्डर्स पक्क्या झाल्या आहेत. पाण्यातून जाण्याची क्षमता आणि इतर खास सुविधांमुळे ही SUV चर्चेत आली आहे. जाणून घ्या किंमत..

| Updated on: Oct 11, 2026 | 7:46 PM
1 / 5
चीनची वाहन उत्पादक कंपनी Geely ने 10 ऑक्टोबर 2026 रोजी आपली नवीन Battleship 700 SUV लॉन्च केली आहे. चीनमध्ये ही SUV Galaxy Zhanjian 700 या नावाने विकली जाते. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 12 मिनिटांत या कारला 10,000 हून अधिक पक्क्या ऑर्डर्स मिळाल्याची माहिती आहे. 
 (सर्व फोटो सौजन्य: मेटा एआय)

चीनची वाहन उत्पादक कंपनी Geely ने 10 ऑक्टोबर 2026 रोजी आपली नवीन Battleship 700 SUV लॉन्च केली आहे. चीनमध्ये ही SUV Galaxy Zhanjian 700 या नावाने विकली जाते. लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 12 मिनिटांत या कारला 10,000 हून अधिक पक्क्या ऑर्डर्स मिळाल्याची माहिती आहे. (सर्व फोटो सौजन्य: मेटा एआय)

2 / 5

Geely Battleship 700 ही प्लग-इन हायब्रिड SUV असून ती 6 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिची सुरुवातीची किंमत 1,79,800 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 25.97 लाख रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची किंमत 3,69,800 युआन म्हणजेच सुमारे 53.42 लाख भारतीय रुपये असण्याची शक्यता आहे.

3 / 5

या SUV मध्ये 47.14 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, CLTC चाचणी मानंकानुसार ही कार केवळ इलेक्ट्रिक मोडमध्ये 305 किमीपर्यंत धावू शकते. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरच्या एकत्रित वापरातून तिची एकूण रेंज 1,770 किमीपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

4 / 5

या कारचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिची ऑफ-रोड क्षमता. कंपनीच्या दाव्यानुसार, ही SUV 800 मिमी खोलीपर्यंतच्या पाण्यातून चालू शकते. तसेच, इमर्जन्सी फ्लोटिंग मोडमध्ये ही कार पाण्यावर तरंगत ताशी 7 किमी वेगाने जास्तीत जास्त 40 मिनिटे पुढे जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

5 / 5

या SUV मध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह अनेक प्रीमियम सुविधा देण्यात आल्या आहेत. केबिनमध्ये एकूण 5 स्क्रीन आहेत. यामध्ये 10.2 इंचांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15.4 इंचांची टचस्क्रीन आणि 15.2 इंचांचा हेड-अप डिस्प्ले यांचा समावेश आहे. याशिवाय, 14-पॉइंट मसाज, सीट व्हेंटिलेशन, हीटिंग, 18.5 लिटरचा फ्रिज आणि 50W वायरलेस चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. टीप: वरील किंमती भारतीय अंदाजीत असून ही SUV चीनमध्ये लॉन्च झाली आहे. भारतातील लॉन्चबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us