
गरबा क्वीन म्हणून ओळखल्या जाणारी फाल्गुनी पाठक गेल्या अनेक वर्षांपासून बोरिवलीच्या सर्वात मोठ्या गरब्यामध्ये सादरीकरण करत होती. मात्र यंदा ती या गरब्यात दिसणार नाही.

यावर्षी फाल्गुनी पाठकऐवजी प्रसिद्ध गायिका गीता रबारी बोरिवलीच्या सर्वात मोठ्या गरब्यामध्ये सादरीकरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बोरिवलीच्या सर्वात मोठ्या गरब्याचा मान राखण्यासाठी गीता रबारी हिंदी आणि गुजराती गाण्यांसह पहिल्यांदा मराठी गाण्यांवर सादरीकरण करणार आहे. यासाठी तिने आधीच तयारी सुरू केली आहे.

एक नंबर तुझी कंबर... गीता रबारी यांनी टीव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी मराठीत गाणीही गायली. गीता रबारी यांनी कार्यक्रमाची वेळ मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.

नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात गीता रबारी यांनी ट्रम्प यांच्यासमोर परफॉर्म केले होते. राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता रबारीचे गाणे ट्विट केले होते.