
घरात सातत्याने फिरणाऱ्या पालीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पाली पाहिल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते. पण या पाली अनेक आजारांना कारणीभूत ठरु शकतात. काही वेळा या पाली जेवणात पडतील किंवा अंगावर पडतील अशी भीती वाटते.

जर तुमच्याही घरात पालींनी उच्छाद मांडला असेल आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही महागडे स्प्रे किंवा रसायनांवर पैसे खर्च करत असाल, तर थांबा कारण पालींना पळवून लावण्यासाठी रसायनांचाच वापर करणे गरजेचे नाही.

तुम्ही काही नैसर्गिक उपाय करुन तुमच्या घरापासून पालींना कायमचं दूर ठेवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला अजिबात जास्त खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला 5 असे सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याच्यासाठी तुम्हाला केवळ 1 रुपयांपासून 5 रुपये खर्च येईल.

लसणाचा तीव्र वास पालींना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. यासाठी काही लसूण पाकळ्या सोलून दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवा. तुम्ही लसणाचा रस पाण्यात मिसळून घरातील वेगवेगळ्या ठिकाणी फवारणी देखील करू शकता.

कांद्याचा तीव्र आणि तिखट वास देखील पालींना पळवून लावण्यास मदत करतो. यासाठी कांद्याचे तुकडे करून जिथे पाल येते, अशा ठिकाणी ठेवा. तसेच कांद्याचा रस काढून पाण्यात मिसळून तो स्प्रे देखील करू शकता.

लिंबू आणि मिरचीचा तिखट वास पालींना पळवून लावण्यासाठी जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो. एका स्प्रे बाटलीत पाणी, थोडे लिंबाचा रस आणि मिरचीची पावडर मिसळून एक मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण जिथे पाली फिरतात, अशा ठिकाणी फवारणी करा. खिडक्यांचे कोपरे, भिंती किंवा दरवाजांच्या मागे तुम्ही हे मिश्रण स्प्रे करु शकता.

अंड्याच्या कवच हा देखील पालींना घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. अंड्याचा कवचाच्या वासाने पालींना तिथे कोणता दुसरा प्राणी आहे असे वाटते. ज्यामुळे ते घाबरुन पळून जातात.

तुम्ही काही अंड्याचे कवच गोळा करून ते दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवू शकता. हे कवच पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही. एकदा ठेवल्यावर ते अनेक दिवसांसाठी तसेच ठेवा. या उपायासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

कॉफी पावडर आणि तंबाखूचे मिश्रण सरड्यांना पळवून लावण्यासाठी एकदम शक्तिशाली उपाय आहे. कॉफी पावडरमध्ये थोडासा तंबाखू मिसळून लहान गोळ्या तयार करा. आता या गोळ्या जिथे पाली असतात, असा ठिकाणी ठेवा. या गोळ्यांमधून निघणारा वास पालीला घरापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)