
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकने तारे जमीन पर आणि शोर इन द सिटी यासह अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीदरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने हलक्या निळ्या रंगाची साडी नेसली होती.

सिंपल लूकमध्ये गिरीजा फार सुंदर दिसत आहे. गिरीजा ओक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गिरीजा ओक हिची चर्चा आहे...

लाल साडीत गिरिजा ओक खूपच सुंदर दिसत आहे. तिने कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. कोणत्या कार्यक्रात तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता..

अभिनेत्रीने डबल शेडमध्ये सिल्क साडी घातली आहे. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगासाठी हा लूक पुन्हा तयार करू शकता. तुम्ही दागिने आणि मेकअपने तुमचा लूक पूर्ण करू शकता.

गिरीजा फक्त साडीमध्येच नाही तर, वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील ग्लॅमरस दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.