GK : भारताची ही 5 नावे तुम्हाला माहिती आहेत का?

India Other Names : भारताला प्राचीन काळापासून विविध नावे मिळाली आहेत, जी संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक स्थानावर आधारित आहेत. आज आपण भारताच्या 5 प्रमुख नावांची माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on: Nov 23, 2025 | 10:08 PM
1 / 5
भारत : हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे. हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे. आपल्या देशाला या नावाने संपू्र्ण जगात ओळखले जाते.

2 / 5
इंडिया : हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे. हे नाव सिंधू (Indus) नदी च्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते. या नावानेही भारताची जगात ओळख आहे.

3 / 5
हिंदुस्थान : हे नाव पर्शियन आणि मुघल राजवटीत लोकप्रिय झाले. 'हिंद' (सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेश) आणि 'स्थान' (ठिकाण/देश) या शब्दांवरून हे नाव तयार झाले.

4 / 5
आर्यावर्त : हे प्राचीन संस्कृत नाव आहे, जे हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंतच्या उत्तर भारताच्या प्रदेशाला अधोरेखीत करत होते, जिथे आर्य लोक राहत होते. त्यामुळे जुन्या काळी या नावानेही भारताची ओळख होती.

5 / 5
जम्बूद्वीप : हे प्राचीन बौद्ध आणि हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेखलेले एक भौगोलिक नाव आहे, जे प्राचीन विशाल भूभागासाठी वापरले जायचे. जम्बूद्वीप म्हणजे सध्याचा भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्व इराण आणि तिबेटचा काही भाग होय.