GK: सापाला किती दात असतात? उत्तर वाचून हैराण व्हाल

साप पाहताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण सापाने चावा घेतल्यास थेट मृत्यू होऊ शकतो. पण सापाला किती दात असतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सापाला किती दात असतात याबाबत माहिती सांगणार आहेत.

| Updated on: Sep 29, 2025 | 6:59 PM
1 / 5
साप हा जगातील सर्वात खतरनाक प्राण्यांपैकी एक आहे. तुम्ही सापाला त्याची जीभ आत-बाहेर करताना पाहिले असेल. पण तुम्ही कधी सापाचे दात पाहिले आहेत का? सापाला किती दात असतात हे तुम्हाला माहिती आहे का?

2 / 5
सापाच्या तोंडाकडे पाहून तुम्हाला वाटत असेल की सापाच्या तोंडात 8-10 दात असतील. मात्र तुमचा अंदाज चुकीचा आहे. एका सापाला सरासरी 100 ते 200 दात असू शकतात.

3 / 5
पृथ्वीवर सापाच्या 400 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. प्रजातींनुसार दातांची संख्या बदलते. काही सापांना 200 पर्यंत दात असतात, तर किंग कोब्रासारख्या विषारी सापांना 100 पेक्षा कमी असतात.

4 / 5
साप आपल्या दातांचा वापर शिकार पकडण्यासाठी आणि विष बाहेर टाकण्यासाठी करतात. महत्त्वाची बाब म्हणजे साप आपल्या दातांचा उपयोग अन्न चावण्यासाठी करत नाहीत.

5 / 5
कोब्रा आणि इतर काही विषारी सापांना विषारी दात असतात, जे 2 किंवा 4 असू शकतात. याचा वापर विष बाहेर टाकण्यासाठी केला जातो. बिनविषारी सापांना विषाचे दात नसतात, त्यांचे लहान दात हे शिकार पकडण्यास फायदेशीर ठरतात.