GK : मुंगी किती वजन उचलू शकते? उत्तर वाचून हैराण व्हाल

Ant Fact : मुंगी हा अतिशय लहान प्राणी आहे. मात्र अनेक मुंग्यांना तुम्ही मोठे वजन उचलताना पाहिलेले असेल. आज आपण एक मुंगी किती वजन उचलू शकते याची माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 28, 2025 | 9:23 PM
1 / 5
मुंगी ही दिसायला लहान असली तरी तिची ताकद खूप जास्त आहे. बहुतांश मुंग्या त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10 ते 50 पट अधिक वजन उचलू शकतात. ही हैराण करणारी बाब आहे.

2 / 5
मुंगीची वजन उचलण्याची क्षमता तिच्या प्रजातीवर अवलंबून असते. आफ्रिकन वेव्हर मुंगी सुमारे 100 पट वजन उचलू शकते. तर एशियन टेलर मुंगी मुंगी देखील 100 पटीहून अधिक वजन उचलू शकते.

3 / 5
जरी मुंगी 50 पट वजन उचलू शकते, तरी हे वजन खरे तर खूप कमी असते. एका सामान्य मुंगीचे वजन सुमारे 1 ते 5 मिलिग्रॅम (0.001 ते 0.005 ग्रॅम) असते. त्यामुळे, ती उचलत असलेले 50 पट वजन फक्त 50 ते 250 मिलिग्रॅम (0.05 ते 0.25 ग्रॅम) इतके असते.

4 / 5
मुंगी सर्वात जास्त ताकद तिच्या जबड्याच्या आणि डोक्याच्या भागातून वापरते. तिचे उर्वरित शरीर अत्यंत मजबूत असते, त्यामुळे तिला वजन उचलताना आणि वाहून नेताना आधार मिळतो.

5 / 5
मुंग्या अनेकदा टीममध्ये काम करतात. जर एखादी वस्तू खूप जड असेल, तर अनेक मुंग्या एकत्र येऊन ती वस्तू सहजपणे हलवतात. यामुळे त्यांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढते.