GK : महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक मांस खाल्ले जाते?

Maharashtra GK : महाराष्ट्रात कोणत्या भागात सर्वात जास्त मांस खाल्ले जाते, याचे उत्तर भौगोलिक विभाग, संस्कृती आणि सरकारी आकडेवारीनुसार दोन प्रकारे देता येते. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 18, 2026 | 11:35 PM
1 / 5
कोकण आणि मुंबई : कोकण किनारपट्टीवर मासे आणि इतर मांसाहार हा रोजच्या अन्नाचा अविभाज्य भाग आहे. मालवणी आणि आगरी संस्कृतीत मांसाहाराला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मासे, कोळंबी, खेकडे यांसारखे समुद्री पदार्थ येथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.

2 / 5
विदर्भ : विदर्भातील, विशेषतः नागपूरमधील 'सावजी' खाद्यसंस्कृती ही तिच्या झणझणीत मांसाहारासाठी जगभर प्रसिद्ध आहे. यासह विदर्भातील इतर भागातही मांसाहार केला जातो.

3 / 5
पश्चिम महाराष्ट्र : कोल्हापूर हे महाराष्ट्राचे मांसाहाराचे मुख्य केंद्र मानले जाते. येथील 'तांबडा रस्सा' आणि 'पांढरा रस्सा' हे मटणाचे प्रकार अत्यंत लोकप्रिय आहेत. पुण्यातही मांसाहारी हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

4 / 5
सांख्यिकी आकडेवारी : भारताच्या एकूण मांस उत्पादनात महाराष्ट्र 12.25 % वाटा राखून देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील 77.32 % मांसाहारी लोक चिकनला प्रथम पसंती देतात.

5 / 5
तिखट आणि मांसाहाराचे प्रमाण : महाराष्ट्रात सर्वात जास्त तिखट आणि मांसाहार खाल्ले जाणारे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यापाठोपाठ नागपूरचा क्रमांक लागतो.